शहर पोलिसांसाठी खूशखबर..! पुढच्या आठवड्यात सातव्या वेतन आयोगानुसार होणार एप्रिल ची पगार

Foto
औरंगाबाद: शहरपोलिस दलातील पोलिसांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रतीक्षेत असलेले सातव्या वेतन आयोगाची वाढीव रक्कम एप्रिल महिन्याच्या पगारात  समाविष्ट करण्यात येणार आहे. सोमवार नंतर हे वेतन १५००  पोलिसांच्या खात्यात जमा होणार आहे.

मागील अनेक महिन्यापासून पोलीस कर्मचारी अधिकारी सातव्या वेतन आयोगाच्या वाढीव रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. रकमेच्या फरकाची प्रक्रिया किचकट असल्याने आणि लोकसभा निवडणुकीमुळे मनुष्यबळ कमतरता भासली. मात्र, तरीही पोलीस आयुक्तांनी वेतन निश्चिती बाबत गांभीर्याने विचार करीत लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. यामुळे आतापर्यंत १५०० पोलीस कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चिती आणि इतर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पंधराशे पोलीस कर्मचऱ्याना सातव्या वेतन आयोगानुसार एप्रिल महिन्याच्या पगारात समाविष्ट करण्यात आला आहे.

सोमवार नंतर या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात येणार आहे.अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे.  तर उर्वरित पोलीस कर्मचारी -अधिकारी यांच्या सेवापुस्तिका तपासणी आणि वेतननिश्चिती चे काम सुरू आहे.त्यांना पुढील महिन्याच्या पगारात वाढीव वेतन देण्यात येणार आहे.